पुणे - महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या आपापसातील कुरघोडी मोठ्या प्रमाणात सुरू असून तिन्ही पक्षांमध्ये "मी मोठा..की तू मोठा, माझं यश मोठं..की तुझं" अशी स्पर्धा सुरू आहे. यातून एकमेकांना मोठं-छोटं दाखविण्याच्या प्रयत्नात तिघांचीही लुटुपुटुची लढाई सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ कोण रिक्षाचा ड्रायव्हर तर कोण मागे बसलेत हे ठरवेल असे स्पष्ट मत मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चिमटा काढला आहे. दरेकर भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे कलवडे कुटुंबाच्या भेटीला आले असताना बोलत होते.
'महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत' - प्रवीण दरेकर बातमी
राज्यात अनेक आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असताना महाविकास आघाडीत सहभागी असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहे. कोरोना व गोरगरीब जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यात वेळ नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
!['महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत' 'महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8179050-138-8179050-1595762909119.jpg)
राज्यात कोरोनाचा गंभीर प्रश्न आहे तर दुसरीकडे बलात्कार, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. अशा गोरगरिब कुटुंबावर अन्यायकारक भावनेतून वाळित टाकले जाते. अशा गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र, हे सरकारमध्ये सहभागी असलेले पक्ष. रिक्षा कुणाची. स्टेअरिंग कुणाच्या हातात आणि मागे कोण बसलेत यामध्ये हे सरकार घुटमळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केला आहे.