महाराष्ट्र

maharashtra

चाकण तरुणीच्या हत्येप्रकरणी कायद्यापुढे कोणी मोठे नाही असा संदेश जावा - प्रवीण दरेकर

By

Published : Jul 26, 2020, 10:17 PM IST

भामा-आसखेड धरण परिसरात 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करुन विवस्त्रावस्थेत मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी असे आवाहन केले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी जेणेकरून कायद्यापुढे कोणी मोठे नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून जाईल असेही ते म्हणाले.

चाकण तरुणी हत्या प्रकरण
चाकण तरुणी हत्या प्रकरण

चाकण (पुणे) : चाकण परिसरात झालेल्या 17 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी आज(रविवार) राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी असे आवाहन केले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी जेणेकरून कायद्यापुढे कोणी मोठे नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून जाईल, असेही ते म्हणाले.

भामा-आसखेड धरण परिसरात 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करुन विवस्त्रावस्थेत मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणी दरेकर म्हणाले, कायद्याच्या धाक कमी झालेला दिसत आहे. पोलिसांची भीती राहिली नाही त्यामुळे अशा क्रूर घटना घडत आहेत. परंतु, पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. तरुणीसोबत अघटित असे काही घडलेले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरुणीच्या अंगावर व्रण आहेत. पोलीस चांगल्या पद्धतीने काम करतील, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, चाकण परिसरातील 17 वर्षीय तरुणीचा खून ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, सामान्य नागरिकांना निर्भीडपणे जगता आलं पाहिजे. म्हणून, आज अप्पर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अधिक माहिती घेत तरुणीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जे कोणी यात सहभागी असेल त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details