पुणे - अनेक भाविकांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही, म्हणून भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिराला भेट देतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलवाडी परिसरात जणू साक्षात पंढरी अवतरली, असे वातावरण निर्माण झाले आहे.
आषाढी एकादशी : भक्तांच्या गर्दीने दुमदुमली पुण्यातील प्रतिपंढरपूर असलेली 'विठ्ठलवाडी' - पासोड्या विठोबा मंदिर
कपाळी चंदनाचा टिळा, मुखी विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण सिंहगड रस्ता यानिमित्ताने गर्दीने फुलून गेला आहे.
कपाळी चंदनाचा टिळा, मुखी विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण सिंहगड रस्ता यावेळी गर्दीने फुलून गेला आहे. या आनंदसोहळ्यात मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले आहेत. याशिवाय पुणे शहरातील आणि उपनगरातील विठ्ठल मंदिरांचा परिसरही पहाटे पाच वाजेपासून विठ्ठलभक्तांच्या गर्दीने गजबजलेला आहे.
नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर, पासोड्या विठोबा मंदिर, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.