पुणे - प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून 18 गुंतवणूकदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी शुभांगी विष्णू काटे (59) यांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. प्रणव मराठे यांना पोलिसांनी तपासासाठी वारंवार हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. परंतु तरीही ते पोलिसांसमोर हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता विशेष न्यायालयाने त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रणव मराठे यांच्यासह कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे आणि आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -