पुणे- देशात भाजपला ३०० जागा मिळतील आणि एनडीएला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या मयुर कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले यावेळी ते बोलत होते.
देशात भाजपला ३०० जागा मिळतील, प्रकाश जावडेकरांचा दावा - girish bapat
भाजप विजयाच्या दाव्यासोबतच त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली
प्रकाश जावडेकरांनी केले मतदान
भाजप विजयाच्या दाव्यासोबतच त्यांनी प्रियंका गांधी तसेच राहुल गांधींवर टीका केली. प्रियांका गांधी यांच्या वाराणसीमध्ये येण्याने काहीही फरक पडणार नाही, असे सांगत राहुल गांधी हे चौकीदार प्रकरणात खोटे बोलत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे. राहुल गांधी सुधारणार नाही, ते खोटे बोलत राहणार आणि जनताच त्यांना धडा शिकवेल असे जावडेकर म्हणाले.