पुणे- मुंबई हल्ल्याच्या वेळी काँग्रेसने लष्कराला पाकिस्तानवर हल्ल्याची परवानगी नाकारली होती. मात्र, मोदींनी पाकिस्तानवर लष्कराला हल्ल्याची परवानगी दिली. हा दोघांच्या कर्तृत्वातील फरक आहे, अशा शब्दात प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली. दरम्यान, या सभेला उशीर झाल्याने सभेच्या ठिकाणच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसने लष्कराला पाकिस्तानवर हल्ल्याची परवानगी नाकारली - प्रकाश जावडेकर - गिरीश बापट
मोदींनी पाकिस्तानवर लष्कराला हल्ल्याची परवानगी दिली. हा दोघांच्या कर्तृत्वातील फरक आहे, अशा शब्दात प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली.
भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कोथरूडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. दरम्यान, सभेला उशीर झाल्यामुळे अनेक नागरिक सभेतून उठून गेले. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या.
नरेंद्र मोदींमुळे जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसून भारताने हल्ला केल्यानंतरही कुठल्या ही देशाने भारतावर आक्षेप घेतला नाही, असेही जावडेकर म्हणाले. यावेळी गिरीश बापट यांनी एनडीए सरकारनी पुण्यातील विकास कामांसाठी ६० हजार कोटी दिल्याचा दावा केला. त्याप्रमाणेच पुन्हा संधी मिळाल्यास एनडीए सरकार अधिक प्रभावी काम करेल, असे आश्वासन ही त्यांनी पुणेकरांना दिला आहे.