पुणे -दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लुप्त झाली. त्यामुळे भाजप आणि आप(आम आदमी पार्टी)मध्ये सरळ लढत झाली. काँग्रेसने आपली मते 'आप'कडे का वळवली? हे जाणून घेणे गरजचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. त्यांनी दिल्लीतील पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर फोडले.
पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील केंद्रीय स्तरावरील विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या दिल्लीतील पराभवाबाबत अमित शाह यांनी केलेले विश्लेषण महत्त्वाचे आहे. मात्र, काँग्रेसने शस्त्र का टाकली हे पाहणेही गरजेचे आहे, असे जावडेकर म्हणाले.