महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलम ३७० : चुकीच्या वेळी सक्तीचा निर्णय - प्रकाश आंबेडकर - विशेष राज्याचा दर्जा

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावाचे काही पक्षांनी समर्थन केले आहे. तर, काही पक्षांनी विरोध केला आहे.

प्रकाश आंबेडकर

By

Published : Aug 5, 2019, 4:48 PM IST

Updated : Aug 5, 2019, 5:14 PM IST

पुणे- जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावाचे काही पक्षांनी समर्थन केले आहे. तर, काही पक्षांनी विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा चुकीच्या वेळी आणि सक्तीचा आहे.

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी प्रमुख

काय म्हणाले आंबेडकर -

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, सरकारला 370 रद्द करायचे होते, तर चर्चा करायला हवी होती. ज्याअर्थी काश्मीरमध्ये सैनिक तैनात केले आहेत. याचा अर्थ तेथील लोकांना कलम 370 रद्द करणे मान्य नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

अमेरिकेच्या सांगण्यारून कलम 370 रद्द -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे काही दिवसांपुर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे हा निर्णय अमेरिकेच्या सांगण्यारून झाला का? हे भाजप सरकार व आरएसएसने स्पष्ट करावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

Last Updated : Aug 5, 2019, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details