निवडणूक आयोगासमोर सध्या सुरू असलेली सुनावणी बेकायदेशीर : प्रकाश आंबेडकर पुणे : प्रकाश आंबेडकर यांनी कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांची भेट घेतली. त्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 10 वे शेड्यूल पाहता निवडणूक आयोगाचा यात काही संबंध येत नाही. निवडणूक आयोगासमोर सध्या सुरू असलेली सुनावणी बेकायदेशीर असून, आता राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर निर्णय देण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. असे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. तसेच, आता चाललेले हे सगळे राजकीय ड्राय केस आहेत. स्टे ऑर्डरवरती सरकार चालवणे ही कोर्टावर नामुष्की आहे, असेदेखील यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी घेतली असीम सरोदे यांची भेट :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. येत्या 14 तारखेपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी केस सुरुवात होण्याची शक्यता आहे. यात घटनेमधील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला नाही, अशी परिस्थितीती आहे.
काही जजमेंट हा उलगडा मान्य करीताहेत :काही जजमेंट हा उलगडा मान्य करीत आहेत. तर काही मान्य करीत नाहीत. काही गोष्टी आजपर्यंत सुनावणीमध्ये मांडण्यात आल्या नाहीत. ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या नाहीत, त्या गोष्टी मांडण्यात याव्यात यासाठी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी आसिम सरोदे यांच्याकडे आल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.
पक्ष फुटला म्हणून आम्हाला ज्युरीडीक्षण :पक्ष फुटला म्हणून आम्हाला ज्युरीडीक्षण आहे. असे या ठिकाणी म्हटले जात आहे. ते खरेच ज्युरीडीक्षण निवडणूक आयोगाला आहे का? मोहिंदर सिंह गिल विरुद्ध निवडणूक असा जो निकाल आहे. त्यात निवडणूक आयोगाने जो एक जजमेंट दिला आहे. त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जे रीपिटीषण जी दाखल करण्यात आली आहे. त्यात ज्युडीशन पॉवर हा निवडणूक आयोगाला नाही. त्यांना फक्त निवडणुकीबाबत अधिकार आहे. असे असताना पक्षातील भांडण हे पक्षातील भांडण आहे. यावर निर्णय देण्याचा अधिकार हा सत्र न्यायालयाला आहे, असेदेखील यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही :वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची नुकतीच युती झाली आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार आहे का? यावर प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही. माझी युती शिवसेनेशी असून, मी महाविकास आघाडीचा भाग नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीशी ठाकरे बोलल्यानंतर वंचितचा निर्णय :काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी उद्धव ठाकरे बोलत आहेत ते ठरेल त्यानंतर बाकी ठरवू, असे यावेळी आंबेडकर म्हणाले. तसेच, पवार यांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की, जुळायचे असले तर सगळीकडे जुळते पण बघायचे लेफ्टकडे हात टाकायचा उजवीकडे हे मला चालत नाही आणि पटत ही नाही, असेदेखील यावेळी आंबेडकर म्हणाले.