पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवासी भाडे आकारण्यात येऊ नये. काळजीपूर्वक त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात यावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारू नये; प्रकाश आंबेडकरांची शासनाला विनंती - travel fares
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना एसटीमार्फत त्यांच्या गावी सोडण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रवासी भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून राज्यांतर्गत स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून भाडे आकारण्यात येऊ नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
गुरुवारी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी काही मुद्दे मांडले होते. त्यापैकी राज्य आणि राज्याबाहेरील स्थलांतरित कामगारांचा एक मुद्दा होता. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना एसटीमार्फत त्यांच्या गावी सोडण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रवासी भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून राज्यांतर्गत स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून भाडे आकारण्यात येऊ नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थलांतरित कामगारांकडे पैसे नसून त्यांची प्रवासी भाडे देण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे शासनाने या मजुरांचा प्रवास खर्च स्वतः करावा आणि या कामगारांना त्यांच्या गावी नेवून सोडावे. शासनाने हा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.