महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सध्यातरी आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचे दार बंद; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? - शरद पवार

Prakash Ambedkar on INDIA Alliance : मागील आठवड्यात वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'इंडिया' आघाडीत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच आज त्यांनी भीमा कोरेगाव इथं सध्यातरी आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचे दार बंद असल्याचं म्हटलंय.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 10:35 AM IST

आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचं दार बंद

पुणे Prakash Ambedkar on INDIA Alliance :गेल्या काही दिवसांपासून 'इंडिया' आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामील करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसंच याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळं कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच आहेत. त्यामुळं अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. आता तरी आमच्यासाठी 'इंडिया' आघाडीचं दार बंद असल्याचं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला भेट देत अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते.



काय म्हणाले प्रकाश आंबेडकर : यावेळी प्रकाश आंबेडकर यांना नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सत्तेत येणं, संविधान वाचवणं, तसंच राज्याची शांतता हा आमचा यावर्षीचा संकल्प असणार आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जात आहेत. याबाबत आंबेडकरांना विचारलं असता ते म्हणाले की, या देशाच्या पंतप्रधान यांनी गेल्या 10 वर्षात देशाला पोकळं केलं आहे. याचा एक आराखडा मांडण्यात येणार आहे.

इंडिया आघाडी'त सहभागी होण्याची 'वंचित'ची इच्छा : मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं होतं. याद्वारे त्यांनी पुन्हा एकदा 'वंचित बहुजन आघाडी'ची 'इंडिया आघाडी'त सहभागी होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान मोदींना हरवणं हेच आपलं एकमेव उद्दिष्ट असल्याचं पत्रात म्हटलं होते. आंबेडकरांनी जागावाटपाचा एक फॉर्म्युला त्या पत्रात सुचवला होता. हा फॉर्म्युलावर X (पूर्वीचं ट्विटर) जाहीरही करुन टाकला. कोणत्याही आघाडीत जागावाटप हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. तयार झालेल्या आघाड्या जागावाटपामुळं तुटतात. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत जाण्याअगोदरच जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यामुळे प्रश्न सोपा होण्याऐवजी अधिकच अवघड झाल्याचं दिसतंय.

  • आंबेडकरांचा फॉर्म्युला काय : आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला 12+12+12+12 आहे. म्हणजे जर चार पक्ष महाराष्ट्रात एकत्र निवडणुक लढवणार असतील तर लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी समसमान वाटप व्हावं. प्रत्येक पक्षाच्या पदरात 12 जागा याव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी सूचवलं आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीपूर्वी बॉम्बस्फोट न करता भाजप निवडणुका कशा जिंकणार? - संजय राऊत
  2. मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या! आंबेडकरांचे महाविकास आघाडीला आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details