पुणे-कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो. मात्र, अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देण्यात यावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
'स्मशानभूमीत काम करणाऱ्यांनाही पीपीई कीट द्या'
औरंगाबाद येथे स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगी समाजाच्या १७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट दिले जातात, तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट का दिले जात नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
स्मशानभूमीत काम करणारा किंवा अग्नी देणारा कर्मचारी हा बहुतांश मसनजोगी समाजाचा असतो. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता अग्नी देण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणून या कर्मचार्यांच्या ताब्यात दिला जातो. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यांना पीपीई कीट दिले जाते. मात्र, स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट का दिले जात नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
औरंगाबाद येथे स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगी समाजाच्या १७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई कीट दिले जातात, तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट का दिले जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझी शासनाला विनंती आहे की, त्यांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.