महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवू नये; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका - voter

गेल्या ५० वर्षात लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

By

Published : May 12, 2019, 8:51 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी घसरलेली असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आंबेडकर बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील दुष्काळ आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असलेल्याप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करत नाही. खरं म्हणजे हा मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे. गेल्या ५० वर्षात लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका केली आहे.
त्याप्रमाणेच बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल, असे मला वाटत नाही. माझ्या मते सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकलसंदर्भात आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येणार नाही. त्याप्रमाणेच देवेगौडा सारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details