पुणे- लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनेही कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुणे मतदार संघाचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची एकत्रीत सभा होणार आहे. ही सभा २१ एप्रिलला रविवारी पुण्याच्या एस.एस.पी.एम मैदानावर दुपारी २ वाजता होणार आहे.
पुण्यात आंबेडकरसह ओवेसींची २१ एप्रिलला सभा, अनिल जाधवांच्या समर्थनार्थ मैदानात - asaduddin owaisi
लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनेही कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुणे मतदार संघाचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची एकत्रीत सभा होणार आहे. ही सभा २१ एप्रिलला रविवारी पुण्याच्या एस.एस.पी.एम मैदानावर दुपारी २ वाजता होणार आहे.
काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर उमेदवार उभे केले आहेत. पुण्यातून अनिल जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे मतदार संघासाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. तत्पूर्वी २१ एप्रिलला ही सभा होणार आहे. यावेळी भारिपचे शहर अध्यक्ष अतुल बहुले, एमआयएमचे शहर अध्यक्ष लियाकत शेख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीतील विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
भाजपनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. तर काँग्रेसनेही बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उरवण्याचे नियोजन केले आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः सोलापुरातुन उमेदवार आहेत. त्यामुळे सध्या ते प्रचारात व्यस्त आहेत. १८ एप्रिलला सोलापूरचे मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर उर्वरित मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या सभा होणार आहेत.