पुणे :पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुळकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याप्रकरणी एटीएसने अटक केली आहे. कुरुळकर यांना २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. DRDO चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर त्यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातील येरवडा कारागृहातील बंदीनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुरुलकर हे उपस्थित होते. आज त्याच प्रदीप कुरुलकरांवर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने कैदी म्हणून येरवडा कारागृहात जाण्याची वेळ आली आहे.
कुरुळकर येरवड्यात कारागृहात : संरक्षण संशोधन संस्थेचे (DRDO) पुणे संचालक प्रदीप कुरुलकर यांना 2 मे रोजी पाकिस्तानला डीआरडीओची माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर कुरुळकरला 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर परत कुरुळकरला एक दिवसाची एटीएस कोठडी सुनावण्यात आली. त्यांना परत 16 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांची 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता कुरुळकर येरवड्यात कारागृहात आहेत. त्यांना २९ तारखेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
येवरवडा कारागृहात ठोकले होते भाषण : प्रदीप कुरुलकर संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक असताना ते अनेक कार्यक्रम, व्याख्यानांना हजेरी लावत असत. कुरुळकर यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांवरही अनेक व्याख्याने दिली आहेत. सात महिन्यांपूर्वी 14 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीनिमित्त कुरुळकर प्रमुख पाहुणे म्हणून येरवडा कारागृहात गेले होते. त्यानंतर त्यांनी तेथील कैद्यांनाही संबोधित केले. पण सात महिन्यांनंतर कैद्याप्रमाणे त्याच तुरुंगात जाण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. मात्र, आज शत्रू पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपावरून कुरुलकरांवर येरवडा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.