पिंपरी-चिंचवड- कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा स्टेन अधिक धोकादायक असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. त्यादृष्टीने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनामुक्त होऊन आल्यानंतरही अनेक व्यक्तींना पोष्ट कोविडच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा देखील शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोष्ट कोविडमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे याची सखोल माहिती डॉ. प्रितम राजेश लांडगे यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीची इतरांसारखीच भयावह होती. सध्या शहरातील कोरोना आटोक्यात आला असून पोष्ट कोविडचे नवीन संकट उभे राहिले आहे. कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींना काही दिवसांमध्येच थकवा जाणवणे, अंगदुखी, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, अशी लक्षणे दिसत आहेत. यात, घाबरून जाण्येसारख नाही. मात्र,दुर्लक्ष करून देखील चालणार नाही असा सल्ला डॉ. प्रितम लांडगे यांनी दिला आहे. ते म्हणाले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर अशक्तपणा येतो. याचे कारण म्हणजे शरीरात असलेल्या कोरोना विषाणूच्या इन्फेक्शन यामुळे रुग्ण म्हणावे तस जेवन करत नाही. त्यामुळे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे हाय प्रोटीन डायट घेणे, जमेल तेवढा व्यायाम, योगासने, प्राणायाम, फिजिओथेरपीचे व्यायाम करणे हे शरीराला आराम देऊ शकतात. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टींमुळे कोविडमुक्त व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळते. यातून बाहेर पडायचे असल्यास कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारणे, आवडत्या गोष्टी करणे, आवडती गाणी पाहणे, ऐकणे, फिरायला जाणे ज्यामुळे नकारात्मकता राहणार नाही. तर, कोणताही त्रास जाणवला तरी जवळच्या दवाखान्यात जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आहार कसा हवा?या काळात सकस आहार आणि गरम आहार घेणे गरजेचा आहे. ज्यात व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स मिळतील असे पदार्थ खाल्ले पाहिजेत जस अंडी, दूध, तूप, पनीर, चिकन, पाले भाज्यांचं सूप, मटण, चिकन यांचं सूप घेतल तरी उत्तम राहील. फळांचे ज्यूस, विशेष म्हणजे दिवसभरात 5-6 लिटर पाणी घेणे आवश्यक आहे असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले आहे.