पुणे -पुणे जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता ( Heavy rain In Pune )आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी ( Red Alert In Pune ) करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता ( Chance of heavy rain in 48 hours ) आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
खडकवासलामध्ये 100 टक्के पाणीसाठा -राज्यभर गेल्या आठवड्यापासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून पुणे शहर तसेच जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहराच्या आजुबाजूला चार महत्वाची धरणे आहेत. त्यात खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांचा समावेश आहे. पानशेत 35.82 टक्के पाणीसाठा, वसरगाव 33.58, टेमधर 21.88 आणि खड़कवासला 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीच्या ( Mutha river ) पात्रात विसर्ग केला जात आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज -पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) सुदंबरन येथील तुकडी सज्ज करण्यात आली आहे. दरम्यान, या तुकडीसाठी मदतीसाठी असणाऱ्या बोटी, दोरखंड, वाहने आणि इतर साहित्यासोबत अतिरिक्त एक बस, इनोव्हा आणि एक ट्रक अशी तीन वाहने देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.