महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्या बाळ यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळातील एक मोठा तारा निखळला - सुप्रिया सुळे - विद्या बाळ श्रद्धांजली न्यूज

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. विद्या बाळ यांच्या निधनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.

विद्या बाळ
विद्या बाळ

By

Published : Jan 30, 2020, 12:08 PM IST

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विद्या बाळ यांच्या निधनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.


विद्या बाळ यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळातील एक मोठा तारा निखळला. त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला खासदार सुप्रिया सुळेंनी बाळ यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा - मिळून साऱ्याजणी'च्या संस्थापक अन् ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री सतेज पाटील यांनी देखील विद्या बाळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'महिलांच्या समान हक्कासाठी झटणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीतील अग्रणी आणि संस्थात्मक कार्यातून कृतीशील समाज घडविण्यासाठी अखंड कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या आपण गमावल्या आहेत,' अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसने आदरांजली दिली.

विद्या बाळ यांचे पार्थिव आज (गुरुवारी) दुपारी २ ते ५ वाजण्याच्या सुमारास प्रभात रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details