बारामती -खोकल्याचे औषध समजून तणनाशक पिल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
बारामती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे (वय ४५, अकोले, ता. इंदापूर) येथे वास्तव्यास होते. दराडे आपली ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना मी हे औषध प्यायलो आहे, असे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.