पुणे -पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि त्यांचा चालक हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात पोलिसाच्या वाहनाचा अपघात, पोलीस निरीक्षकासह चालक जखमी - palice van accident in pune
पुण्यात शुक्रवारी सकाळी पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. सकाळी ते घरातून पोलीस ठाण्यात येत होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला धडकली. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले.

पोलीस निरीक्षक राम राजमाने हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. आज सकाळी ते घरातून पोलीस ठाण्यात येत होते. त्यावेळी कृषी महाविद्यालयासमोरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला धडकली. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, राम राजेमाने त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर चालकाच्या पायाला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले.