आळंदी (पुणे) -ह. भ. प. बंडातात्या कराडकर हे पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सध्या त्यांना आळंदी-पुणे रोडवरील संकल्प गार्डन मंगल कार्यालय येथे त्यांच्या समर्थकांसह पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे इतर समर्थक स्थानबद्ध केलेल्या ठिकाणाच्या समोर टाळ मृदुंगाच्या गजरात ठिय्या मांडून बसले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे कराडकरांनी जाहीर केले. त्यानुसार पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले. मात्र, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
पायी वारी नसल्याने वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त -
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यावेळीही मानाच्या पालख्या एसटीच्या माध्यमातून पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायीवारी दिंडीची परवानगी घ्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी, भारतीय जनता पार्टी तसेच तसेच इतर संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, पायीवारी दिंडी दरम्यान वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वारीत सहभागी होतील. यामुळे पांडुरंगाची होणारी आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या पायी दिंडी संदर्भात महाराज मंडळींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -VIDEO : बंडातात्या कराडकर यांची सरकारला काळजी आहे म्हणूनच हे निर्बंध - नीलम गोऱ्हे
माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण