महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 'स्पा सेंटर'च्या नावाखाली तरुणींकडून वेश्या व्यवसाय; चार तरुणीची सुटका - स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून चार तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक व अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे.

v
v

By

Published : Sep 18, 2021, 5:29 PM IST

Updated : Sep 18, 2021, 7:20 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे)- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या व्यवस्थापकाला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. चार तरुणींची या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली असून आरोपींकडून 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 'स्पा सेंटर'च्या नावाखाली तरुणींकडून वेश्या व्यवसाय,चार तरुणीची सुटका

या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक दीपक नामदेव साळुंखे आणि अमित विश्वनाथ काटे, अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दीपक नामदेवला बेड्या ठोकल्या असून अमित काटेचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती या ठिकाणी एक स्पा सेंटर सुरू होते. मात्र, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाला स्पा सेंटरमध्ये बळजबरीने तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर छापा टाकून चार तरुणींची सुटका केली.

या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ.अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंदे, भगवंता यांनी केली आहे.

हेही वाचा -कामावरून काढून टाकल्याचा राग, ड्रायव्हरने मालकाची पेटवली क्रेटा, इनोव्हा; 22 लाखांचे नुकसान

Last Updated : Sep 18, 2021, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details