महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होम क्वारंटाइनचे शिक्के असताना करत होते प्रवास, 16 जणांना पोलिसांनी पकडले - होम क्वारंटाईन

सर्वांना उस्मानाबाद येथील उमरगा येथेच हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. ३१ मार्चला हे सर्वजण गुपचूप रात्री एका मोटारीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, जागोजागी नाकाबंदी असल्याने त्यांनी रात्री उशिरा प्रवास सुरु केला.

होम क्वारंटाइनचे शिक्के असताना करत होते प्रवास
होम क्वारंटाइनचे शिक्के असताना करत होते प्रवास

By

Published : Apr 2, 2020, 3:01 PM IST

पुणे- हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के असलेले 16 जण मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वडगाव पोलिसांनी त्यांची चौकशी करत त्यांना पुन्हा एकदा होम क्वारंटाईन केले आहे. हे सर्व व्यक्ती मुंबईमधील आहेत. यात 4 महिला 3 पुरुष आणि 9 लहान तसेच मोठ्या मुलांचादेखील समावेश आहे.

नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने मुंबईमधून संबंधित १६ जण हे उस्मानाबाद येथील उमरगा येथे गेले होते. तेथील सर्व विधी करून ते परतणार इतक्यात गावातील नागरिकांनी ते मुंबईवरून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाला दिली. सर्वांना उस्मानाबाद येथील उमरगा येथेच हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

३१ मार्चला हे सर्वजण गुपचूप रात्री एका चारचाकीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, जागोजागी नाकाबंदी असल्याने त्यांनी रात्री उशिरा प्रवास सुरु केला. मात्र, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरू होती. तेव्हा हे सर्वजण एका वाहनातून एकत्र प्रवास करत असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यांच्या हातावर शिक्के असल्याचे दिसताच त्यांना तातडीने वडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पुन्हा होम क्वारंटाईनसाठी दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details