महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघड; चोरी प्रकरणात पोलीस निरीक्षकच निघाला म्होरक्या - chakan police station

चाकण औद्योगिक वसाहतीत कुंपनच शेन खात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला तीन दरोडेखोरांसह पोलीस उपनिरिक्षकावर गुन्हा दाखल

chakan police station
चाकण पोलीस ठाणे

By

Published : Oct 10, 2020, 9:30 PM IST

पुणे -चाकण औद्योगिक वसाहतीत चोरी, दरोडासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चाकण आणि महाळुंगे पोलीस दरोडेखोरांना चाप बसविण्यासाठी तपास करत असताना "कुंपनच शेत खात असल्याचा" धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. यावेळी महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकानेच हा दरोड्याचा प्लॉन करुन ही चोरी घडवून आणली. तसेच चोरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रम पासलकर असे या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे.

चाकण परिसरातील रोहकल येथुन जात असताना कंटेनर लुटण्यात आला होता. या कंटेनरमधील टाटा कंपनीचे स्पेअरपार्ट आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत, चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी केली असता दरोड्याच्या संपूर्ण प्लानमध्ये पोलीस उपनिरिक्षकच सहभागी असल्याची कबुली तिघांनी दिली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ पसरली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर हे चोरी, दरोडा कसा करायचा? याबाबत प्लान करत होते. तसेच दरोड्यातील मुद्देमालाचीही विल्हेवाट लावुन पुढील दरोड्याची आखणी करत होते. त्यानुसार आरोपींसोबत गुन्ह्याबाबत संवाद केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पासलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी पासलकर फरार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details