महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड तालुक्यात सुमारे अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त - daund pune

राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग पुणे यांनी गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून दौंड तालुक्यातील कानगांव गावाचे हद्दीत सापळा लावला.

दौंड तालुक्यात सुमारे अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त
दौंड तालुक्यात सुमारे अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त

By

Published : Mar 22, 2021, 10:16 PM IST

दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या वतीने सापळा रचून गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला अवैध मद्याचा साठा हस्तगत करत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मद्याची आणि वाहनांची किंमत सुमारे २ लाख ४३ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

सापळा रचून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग पुणे यांनी गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून दौंड तालुक्यातील कानगांव गावाचे हद्दीत सापळा लावला. यावेळी कानगांव-हातवळण रोडवर संशयित कार क्र. एमएच 17 ए.जी 5724 थांबविण्यात आली. कारची तपासणी करत असताना खाकी रंगाचे मद्याचे बॉक्स त्यात आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा चालक प्रशांत अरूणराव भोर, (वय 31 वर्ष रा.काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)याला अटक करण्यात आली आहे.

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत व्हीस्कीचे एकूण 17 बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत सुमारे अडीच लाख इतकी आहे. या प्रकरणी आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (क, ङ), 81 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अ.व द.)सुनील चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. के. कान्हेकर यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईत निरीक्षक बी.व्ही. ढवळे,दुय्यम निरीक्षक विकास थोरात, सतीश काळभोर, जवान चंद्रकांत इंगळे,मोहन गवळी,सोहन मालुसरे, नवनाथ पडवळ, वाहनचालक, प्रमोद खरसडे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. के. कान्हेकर हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details