बारामती (पुणे)- बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी बारामतीतील दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. बारामतीतील जुनी मंडई येथील आशिष ट्रेडर्स व तेजस जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई करत दुकान मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लास्टिक, नायलॉन सिंथिटिक मांजामुळे पक्षी व मनुष्यास दुखापत होत असल्याने उच्च न्यायालयाने व पर्यावरण विभागाने मांजावर बंदी घातली आहे. या हानिकारक मांजावरील दुकानात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रॉनिक मशीन, मांजाचे अठरा बंडल, असा 11 हजार 400 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.