बारामती -एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी (आज) केलेल्या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन करून दगडफेक, चप्पलफेक करत हल्ला केला. खबरदारी म्हणून पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवास्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Police Security Increase Govindbagh : शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला - बारामती शरद पवार पोलीस सुरक्षा
गोविंदबाग निवासस्थानात सध्या पवार कुटुंबियांपैकी कोणीही राहण्यासाठी नाही. परंतु अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली गेल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेने मोर्चा वळवला. एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली.
वाढविलेला पोलीस बंदोबस्त
Last Updated : Apr 8, 2022, 8:46 PM IST