पुणे- येथील कर्वेनगर परिसरात फाशी घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
पुण्यात फाशी घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले - गळफास
पुणे येथील कर्वेनगर परिसरात फाशी घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास एक महिला वारजे पोलीस ठाण्यात धावत आली. आणि माझा मुलगा आत्महत्या करत आहे, त्याला वाचवा असे तिने पोलीस ठाण्यात सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्याच्या घराचा दरवाजा तोडला.
या तरुणाने ओढणीने गळफास घेतला होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कात्रीने ओढणी कापून त्याला खाली उतरवले. यानतंर या तरूणाल जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप मात्र, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.