पुणे- अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सासवड येथील एकूण 5 मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 97 हजार रोख रकमेसह 3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ऑनलाईन बिंगो मटक्यावर छापा; बारामती क्राईम ब्रँचची कारवाई - बारामती तालुक्यातील माळेगाव
गोपनीय माहितीच्या आधारे बारामती तालुक्यातील माळेगाव येथील 1 आणि सासवड येथील 4 अशा एकूण 5 मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे बारामती तालुक्यातील माळेगाव येथील 1 आणि सासवड येथील 4 अशा एकूण 5 मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी 97 हजार 150 रोख रकमेसह चार कॉम्प्युटर संच, चार एलईडी स्क्रीन, मोबाईल, सीसीटीव्ही, डीव्हीआर, सह 2 लाख 6 हजार 830 रुपयांचे साहित्य असा 3 लाख तीन हजार 980 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. माळेगाव येथील दोन तर सासवड येथील सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सासवड येथील ऑनलाईन बिंगो अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ओंकार चंद्रकांत गायकवाड, इरफान इसाक बागवान, धर्मराज कृष्णाजी जगताप, आनंद दशरथ बुद्धिवंत, विकास चंद्रकांत कसबे, विशाल सुनील भोंडवे सर्व रा. सासवड, मयूर दुर्गा जगताप (फरार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, विजय वाघमारे, पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा, पवार तसेच अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, सहा. निरीक्षक राहुल गुघे, भरत आरडे, भाऊसाहेब खाडे यांनी केली ही कामगिरी बजावली आहे.