महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Raped Lady Police : पिस्तुलचा धाक दाखवून पोलिसाचा महिला पोलिसावर वारंवार अत्याचार - Police Raped Lady Police

Police Raped Lady Police : कोरोना काळात झालेल्या ओळखीतून पोलीस शिपायानं महिला पोलीस शिपायावर अत्याचार केल्यानं खळबळ उडाली आहे. या पोलीस शिपायानं पिस्तुलाच्या धाकानं अनेकदा अत्याचार केल्याची तक्रार या महिला शिपायानं खडक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Police Raped On Woman
महिला पोलिसावर अत्याचार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:05 PM IST

पुणे Police Raped Lady Police :शहर पोलीस दलातील शिपायानं पिस्तुलाच्या धाकानं महिला पोलीस शिपायावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात उघडकीस आली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महिला शिपायानं दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचारी शिपायाविरोधात गुन्हा ( Pune Rape Case) दाखल करण्यात आला आहे. दीपक सिताराम मोघे असं अत्याचारी पोलीस शिपायाचं नाव आहे.

कोरोना काळात केला अत्याचार :नराधम पोलीस शिपाई दीपक सिताराम मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पुण्यातील पोलीस वसाहत तसंच खडकवासला येथील लॉजवर 2020 ते 1 ऑगस्ट 2023 या दरम्यान नराधम दीपकनं हा अत्याचार केल्याची तक्रार महिला शिपायानं दिली आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नराधम दीपक मोघेनं महिला शिपायासोबत ओळख वाढवली. महिला शिपाई जेवणासाठी घरी येत असताना तिला गुंगीचं औषध देऊन नराधम पोलीस शिपाई दीपक मोघेनं पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्यानं बलात्कार केल्याची तक्रार पीडितेनं दिली आहे. दीपक मोघेनं पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचंही महिला शिपायानं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

कोल्ड्रींक्समध्ये दिलं गुंगीचं औषध :महिला पोलीस शिपाई आणि आरोपी दीपक मोघे हे दोघेही शहर पोलीस दलात असून शहरातील पोलीस वसाहतीत राहतात. कोरोना काळात कर्तव्यावर असताना नराधम दीपक मोघेनं पीडित महिलेसोबत ओळख वाढवली. त्यामुळे तो महिलेच्या घरी जेवणासाठी ये जा करत होता. एकदा दीपक मोघेनं पीडितेच्या कोल्ड्रींकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं. त्यामुळे पीडितेस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्यानं पीडितेला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन पीडितेला झोप लागल्याचा दावा पीडितेनं आपल्या तक्रारीत केलाय. यावेळी दीपक मोघेनं पीडितेवर अत्याचार केले. यावेळी अत्याचाराचा व्हिडिओ दीपक मोघेनं तयार केल्याचा दावा पीडितेनं केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. यावेळी दीपक मोघेनं पीडितेच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर दीपक मोघेनं धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावाही पीडितेनं आपल्या तक्रारीत नमूद केला आहे.

सोन्यासह लॅपटॉप, मोबाईल पळवला :नराधम दीपक मोघेनं पीडितेच्या घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि लॅपटॉप जबरदस्तीनं घेऊन गेल्याचा आरोप पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. यात 5 ते 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने, डोंगल अशा सामानाचाही समावेश असल्याचं पीडितेनं स्पष्ट केलं आहे. याबाबत खडक पोलीस ठाण्यात आरोपी दीपक मोघे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. खळबळजनक.. एसीपी असल्याचे सांगून पुण्यात शिक्षिकेवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details