महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 47 हजारांचा मुद्देमाल जप्त - पुणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूच्या दोन अड्ड्यांवर यवत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 47 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या हातभट्टी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाक्या आणि बॅलरची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा
हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

By

Published : Mar 24, 2021, 7:21 PM IST

दौंड - दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूच्या दोन अड्ड्यांवर यवत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 47 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या हातभट्टी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाक्या आणि बॅलरची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

घटनास्थळावरून जप्त केलेली दारू केली नष्ट

घटनास्थळावरून 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील यवत गावात हातभट्टीची दारू बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, व तयार दारू असा एकूण 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पोलिसांना पाहाताच आरोपी अरुण नानावत (वय ३२) हा घटनास्थळावरून फरार झाला.

हेही वाचा -बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details