पुणे - जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ४४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ६ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामती गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.
खेड शिवापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा
खेड शिवापूरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये पत्ते, मटका, सोरट खेळत असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती. त्यानुसार बारामती गुन्हे शोध पथकाने खेड शिवापूरमधील याठिकाणी छापा मारून ४४ जणांना ताब्यात घेतले आहे.
खेड शिवापूरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये पत्ते, मटका, सोरट, खेळत असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती. त्यानुसार बारामती गुन्हे शोध पथकाने खेड शिवापूरमध्ये छापा टाकून ४४ जणांना ताब्यात घेतले. यावेळी ६ लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, मुंबई येथील बुकी हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खेड शिवापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत कृष्णा व्हेज नॉन व्हेज हॉटेलच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये राजू कोंडे, नाना कोंडे, पंकज कोंडे हे तीन पत्ती जुगार चालवत होते. या पत्र्याच्या शेडबाहेर एका मोकळ्या जागेत मोटरसायकल तसेच एक चारचाकी वाहन पार्क केलेले होते. शेडमध्ये मधोमध पार्टिशन करून पत्ते, मटका, सोरट खेळला जात होता. बारामती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून एकूण ६ लाख ८२ हजार ३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ३ आरोपी फरार झाले आहेत.