पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात अवैद्य दारू विक्री आणि ऑनलाईन जुगार मटक्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथक आणि निगडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी हॉटेल चालक शाम तापकीर, संतोष जाधव, यांच्यासह हॉटेलमध्ये असलेल्या पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार जणांसह 24 जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पवळे उड्डाण पुलाखाली काही व्यक्ती ऑनलाइन जुगार चालवत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी निगडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला.
4 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त-
यात, जुगार चालविणारा मालक, चालक व जुगार खेळणाऱ्या एकूण 24 जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 63 हजारांचे 13 मोबाईल, 55 हजारांचे जुगार खेळण्याचे साहित्य, 6 दुचाकी, असा एकूण 4 लाख 17 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईमध्ये 15 जणांवर गुन्हा दाखल-