पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने मद्यपान करून महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि. 18 सप्टें.) रात्री घडली.
या प्रकरणी संबंधित महिला पोलिसाने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलीस मारुती हरिभाऊ बढेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तक्रारदार महिला या दिघी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून रात्रपाळीस कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी पोलीस कर्मचारी मारुती बढेकर हा चऱ्होली येथे मार्शल म्हणून ड्युटीवर होता. बढेकर मद्यपान करून दिघी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने महिला पोलिसाशी बाचाबाची करत शिवीगाळ केली.
पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलिसाला शिवीगाळ - पिंपरी-चिंचवड पोलीस बातमी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ गेल्याची घटना घडली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय