महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह - Corona Positive in Pune

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी कोरोनाबाधित आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून कोरोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad Police Commissionerate
पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 18, 2020, 7:44 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी कोरोनाबाधित आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी देहूरोडच्या परिसरात राहणाऱ्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. आता पोलीस आयुक्तालयातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात असून कोरोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस दलात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून दोन दिवसांपूर्वी देहूरोड येथील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा असल्याचं निष्पन्न झाले होते. परंतु, आज पोलीस आयुक्तालयातच कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. तर देहूरोड येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे अवघे कुटुंबच कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. तर वाकड परिसरात राहात असलेल्या मात्र पुण्यात कार्यकरत असलेल्या पोलिसाला देखील कोरोना झाला होता. दरम्यान, आयुक्तालयात संबंधित पोलीस अधिकारी सर्वत्र कामानिमित्त फिरत होते. त्यामुळे किती पोलीस अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटाइन होणार हे महत्त्वाचे आहे. मात्र, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details