महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्दी टाळण्यासाठी लढवली 'ही' शक्कल, पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव - corona update

कोरोना विषाणूबाधित व्यक्तींपासून काही फुटावर उभे राहिल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासन वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र, आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव ठाण्याच्या पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

pimpari chinchwad pune  पिंपरी चिंचवड पुणे  कोरोना पुणे  कोरोना अपडेट  कोरोना महाराष्ट्र  corona update  corona maharashtra
गर्दी टाळण्यासाठी लढवली 'ही' शक्कल, पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

By

Published : Mar 25, 2020, 12:46 PM IST

पुणे - शासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव ठाण्याच्या पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी भाजी मंडईमध्ये एक मीटरच्या अंतरावर बॉक्स तयार केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

गर्दी टाळण्यासाठी लढवली 'ही' शक्कल, पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचे मत घेऊन ही शक्कल लढवली आहे. भाजी मंडईमध्ये नेहमीच गर्दी असते. मात्र, आता कोरोनामुळे सतर्क राहण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे तळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन एका ठिकाणी भाजी मंडई आणि फळ विक्रेता अशी पाच दुकाने वेगवेगळी ठेवण्याचे ठरवले. त्याच्यासमोर एक मीटर अंतर ठेवत काही बॉक्स केले, जेणेकरून नागरिकांमध्ये अंतर राहील आणि कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल. दरम्यान, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. तळेगावमध्ये पाच ठिकाणी हाच उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे त्याठिकाणी नागरिकांची अजिबात गर्दी होत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details