पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोरवाडी परिसरात ही घटना घडली. अभिषेक दळवी (वय-२९), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या - पिंपरी चिंचवड आत्महत्या
पिंपरी-चिंचवड येथे पोलीस निरीक्षकाच्या मुलानी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

मृत अभिषेक दळवी
अभिषेक हा पोलीस निरीक्षक अनिल दळवी यांचा मुलगा आहे. अनिल दळवी हे सांगली जिल्ह्यात कार्यरत असून त्यांचे कुटुंबीय पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे. गेल्या वर्षभरापूर्वीच अभिषेकचे लग्न झाले होते. त्याने बुधवारी रात्री खोलीचे दार लावून दारू प्यायली. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.