पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 22 मोबाईल, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहे.
शहरातील 9 जबरी चोरी, 4 घरफोडी, 1 वाहन चोरी, इतर दोन चोऱ्या, असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी शेखर संभाजी जाधव, राहुल रमेश चव्हाण, करण गुरुनाथ राठोड, कृष्णा संजय तांगतोडे आणि विकी कमल, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी व्यक्तींचे मोबाईल हिसकावणारे तसेच घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 22 मोबाईल, सोन्याचे गंठन, कानातील जोड, दोन दुचाकी आणि हत्यारे असा एकूण 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
घरफोडी आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक; 22 मोबाईल हस्तगत - पुणे चोरी बातमी
पिंपरी-चिंचवड शहरात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने आवळल्या आहेत. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
टोळी व पोलीस
या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील 14 तर चिखली, आळंदी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 गुन्हा असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. सराईत गुन्हेगार शेखर जाधव याच्यावर उदगीर आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा -रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा विरोध; सहभागी न होण्याचा निर्णय