बारामती (पुणे)-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल ट्विटर अकाउंटवर आक्षेपार्ह मजकूर लिहून शेअर केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वेदश्री @वेदश्री_१९ या ट्विटर वापरकर्त्यावर आणि राजे हर्षवर्धन शास्त्री या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसात तक्रार दाखल करणारे अभिजीत जाधव व त्यांचा मित्र अजित कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अजित कदम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तसेच देश-विदेशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडीचा पाठपुरावा घेत असतात. कदम हे आज ट्विटरवरील घडामोडी पाहत होते. तेव्हा त्यांना वेदश्री या ट्विटर अकाउंटवरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे तसेच या मजकुराला राजे हर्षवर्धन शास्त्री या अकाऊंटवरून आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा-ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप