महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांकडून रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना फळे आणि खजूर वाटप - coronavirus outbreak

प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा रमजानच्या महिन्यात नमाज मशिदीत पठण करणे शक्य नाही. सर्व मुस्लीम बांधव घरातच नमाज पढत आहेत. नागरिकांनी अजून काही दिवस सहकार्य केल्यास कोरोना विरुद्धचा लढा आपण नक्की जिंकू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांनी व्यक्त केला.

पोलिसांकडून रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना फळे आणि खजूर वाटप
पोलिसांकडून रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना फळे आणि खजूर वाटप

By

Published : Apr 29, 2020, 12:31 PM IST

पुणे - मुस्लीम बांधव रोजे सुरू असल्याने इफ्तारीच्या वेळेस म्हणजे रोजा सोडताना फळे आणि खजूर सेवन करतात. ही बाब लक्षात घेत पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिसांनी गरीब मुस्लीम बांधवांना फळे आणि खजूर वाटप करत अनोख्या पद्धतीने सौहार्दाचे दर्शन घडवले आहे.

पोलिसांकडून रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना फळे आणि खजूर वाटप

एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे संपूर्ण पिंपरी शहरला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्याने कोणालाही बाहेर पडणे शक्य नाही. इफ्तारीसाठी हे खाद्य पदार्थ आणायचे कसे, हा प्रश्न अनेक मुस्लीम बांधवांना पडला होता. मात्र, वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर आणि पोलीस अधिकारी हरीश माने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी स्वतःजवळील पैसे जमवत हे साहित्य खरेदी केले. ते गरजू मुस्लिम बांधवांना घरपोच करण्यात आले.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा रमजानच्या महिन्यात नमाज मशिदीत पठण करणे शक्य नाही. सर्व मुस्लीम बांधव घरात बसूनच नमाज पठण करत आहेत. याबद्दल मुगळीकर यांनी त्यांचे आभार मानले. अशाच पद्धतीने शहरातील सर्व नागरिकांनी अजून काही दिवस सहकार्य केल्यास कोरोना विरुद्धचा लढा आपण नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details