पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस नाईक रमेश लोहेकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांचा सकाळीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 504 वर पोहोचली असून, त्यांपैकी 494 जण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या सात जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; पोलीस आयुक्तालयात 504 जण बाधित
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 504 वर पोहचली असून पैकी 494 जण बरे झाले आहेत. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. चिंचवडमध्ये कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलीस नाईक रमेश लोहेकर हे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रमेश लोहेकर यांच्यासह कुटुंबातील आठ वर्षीय चिमुकलीला कोरोनाचा लागण झाली होती. लोहेकर यांच्यावर चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची प्रकृती बरी झाल्याने चार-पाच दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पुन्हा चार दिवसांनी त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रेमडिसीवीर इंजेक्शन दिले गेले, तसेच इतर उपचार करण्यात आले. मात्र, या सर्व उपचारांचा काहीच परिणाम न झाल्याने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी झाली आहे. दिवसेंदिवस ती ओसरत असून कोरोना आटोक्यात येत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आत्तापर्यंत 504 जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी 494 पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी कोरोनावर मात केली आहे. तर, तीन जणांना मृत्यू झाला असून इतर सात जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली आहे.