महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोंढवा दुर्घटना : आरोपी बांधकाम व्यावसायिकांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ - विपुल आणि विवेक अग्रवाल यांची पोलीस कोठडी वाढविली

कोंढव्यातील अल्कोन स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील विपुल आणि विवेक अग्रवाल यांची पुणे सत्र न्यायालयाले ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.

आरोपीला घेउन जातांना पोलीस

By

Published : Jul 2, 2019, 5:53 PM IST

पुणे- कोंढव्यातील अल्कोन स्टायलश या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी (२९ जून) मध्यरात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक अग्रवाल बंधूसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील विपुल आणि विवेक अग्रवाल यांची पुणे सत्र न्यायालयाले ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.

आरोपीला घेउन जाताना पोलीस


कोंढव्यात झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी अल्कान स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक अग्रवाल बंधूसह आठ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यागुन्हे दाखल करण्यात आला होता. यातील विपुल आणि विवेक अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकांना कोंढवा पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यांना रविवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस रामदिन यांनी त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज परत न्यायालयात हजर केले गेले. आता न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडी ६ जुलै पर्यंत वाढविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details