पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील विधीसंघर्ष बालक हे झोपडपट्टीत राहणारे आहेत. गुन्हेगारी कृत्य केलेल्या बालकांना समाजासोबत जोडायचे आहे. अशा मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याऐवजी त्यांची मानसिकता बदलवयाची आहे. त्यांच्यातील उर्जेला योग्य दिशा दिली पाहिजे तरच समाज गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. ते, चिंचवड येथे विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसन या विशेष एक दिवसीय चर्चासत्रात बोलत होते.
कृष्ण प्रकाश म्हणाले, की पिंपरी-चिंचवड परिसरातील बहुतांश विधीसंघर्ष ग्रस्त बालकांच्या सभोवतालच्या वातावरणामुळे त्यांच्यात विशिष्ट मानसिकता तयार होऊन ही अल्पवयीन मुले त्यांची स्व:ताची नवीन सिस्टिम तयार करतात. चुकीची पद्धती अवलंबतात आणि गुन्हेगारी कृत्यांकडे वळतात. युवाशक्ती आपले भवितव्य आहे. अशा मुलांना गुन्हेगार म्हणून वागणूक दिली जाऊ नये. या मुलांना समाजासोबत जोडण्याची प्रक्रिया करायची आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्यांना रोजगार, राहण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे. अशा युवकांना भरकटू न देता योग्य मार्ग दाखविणे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती वरदान व अभिशापही आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यासाठी शहरातील अशा बालकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी शहरातील विविध घटक, संस्था, संघटना यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
'विधीसंघर्ष बालकांच्या उर्जेला योग्य दिशा दिल्यास समाज गुन्हेगारीमुक्त होईल'
शहरातील विधीसंघर्ष बालकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी शहरातील विविध घटक, संस्था, संघटना यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे
कृष्ण प्रकाश
यावेळी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, गिरीश प्रभुणे तसेच सर्व विभागचे सहायक पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.