पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोविडच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात महिला पोलीस कर्मचारी, सफाई करणाऱ्या महिला कामगार अविरतपणे आपले कर्तव्य बजावत असून अशाच साहसी दुर्गांचा सन्मान पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक भान राखून विद्या जोशी यांनी केला आहे. सध्या मंदिरे बंद असून याच कोविड योध्दा आपल्यासाठी दुर्गांचे रूप असून त्यांचा ओटी भरून सन्मान करण्यात आला आहे. त्यांना मास्क देण्यात आले. या सन्मानाने कोविड योध्दा पोलीस कर्मचारी आणि सफाई कामगार महिला भाराहून गेल्या होत्या.
24 तास ऑन ड्युटी असल्याने उत्सवात सहभागी होता येत नाही. मात्र, जोशी यांनी केलेल्या सन्मानाने काही क्षण आनंद अनुभवयास मिळाला असे महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा राजेश भरगुडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांपासून कोविडने थैमान घातले आहे. 24 तास ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलिसांना आपले चोख कर्तव्य बजावावे लागत आहे. तर, सफाई कामगार महिलांची देखील वेगळी गोष्ट नाही. त्यांच्यावर देखील अविरतपणे शहर स्वछ ठेवण्याची मोठी जबाबदारी असून घरच्या मुला-बाळांचा विचार न करता आपले काम करावे लागते. अशाच दुर्गांचा ज्यांनी केवळ समाजाच काही देणं लागतो या भावणेतून कर्तव्य बजावलं आहे. त्यांचा नवरात्रोत्सवात विद्या जोशी या सजग महिलेने खाकी वर्दीतील महिला पोलीस कर्मचारी आणि सफाई महिला कर्मचारी यांचा ओटी भरून सन्मान केला असून वेगळा पायंडा पाडला आहे. तांदूळ, बांगड्या, ब्लाउज पीस, नारळ आणि मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना योध्या पोलीस, सफाई कामगार महिलांचा नवरात्रौत्सवात ओटी भरून सन्मान - कोरोना योध्या पोलीस ओटी भरून सन्मान
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांपासून कोविडने थैमान घातले आहे. 24 तास ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलिसांना आपले चोख कर्तव्य बजावावे लागत आहे. तर, सफाई कामगार महिलांची देखील वेगळी गोष्ट नाही. त्यांच्यावर देखील अविरतपणे शहर स्वछ ठेवण्याची मोठी जबाबदारी असून घरच्या मुला-बाळांचा विचार न करता आपले काम करावे लागते.
हेही वाचा- धक्कादायक! आजारी व्यक्तीला गंभीर जखमी करून जिवंत जाळले; तासाभरातच आरोपीला अटक
यावेळी विद्या जोशी म्हणाल्या की, कोरोना योद्धे असलेल्या महिला पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्यासाठी काहीतरी करावं असे वाटले, म्हणून हा उपक्रम केला आहे. यावर्षी मंदिर जरी बंद असली तरी या खऱ्या खुऱ्या देवींचा सन्मान आणि सत्कार केला आहे. त्याचे समाधान आहे. तर, महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा राजेश भरगुडे म्हणाल्या की, गेल्या सहा महिन्यांपासून कर्तव्य बजावत असून त्यांची पावती मिळाली आहे याचे समाधान आहे. त्यांनी आज कोरोना योद्धे म्हणून सन्मान केला आहे. कर्तव्यामुळे सण साजरे करता येत नाहीत. यानिमित्ताने काही क्षण आनंदाचे अनुभवता आले आहेत. कुटुंब सांभाळून आमचं कर्तव्य बजावत आहोत. त्याच बरोबर सफाई कामगार विमल कसबे म्हणाल्या की, सफाई कामगारांना वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पण, आम्ही आमच्या मुलांचा कुटुंबाचा जीव धोक्यात घालून साफसफाईचे काम करतो आहोत. आज जो सन्मान केला खूप छान वाटलं, अशीच सर्वांनी सन्मान जनक वागणूक द्यावी अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.