महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Bharati Scam: पोलीस शिपाई भरती परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्यांना 10 जणांना अटक, रॅकेटचा 'असा' झाला पर्दाफाश

आपण परिक्षेत कॉपी झाल्याचा प्रकार नेहमीच ऐकतो. परंतु पुण्यातून मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एसआरपीएफच्या परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. कानात दिसणार नाही, असे उपकरण लावून कॉपी केली जात होती. स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही गोष्ट आढळून आल्यानंतर, या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे.

Pune Crime News
हायटेक कॉपी

By

Published : Jul 26, 2023, 8:35 AM IST

पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया

पुणे : एसआरपीएफच्या पोलीस शिपाई भरती परीक्षेत 'हायटेक' कॉपीबहाद्दरांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्या ठिकाणी या उमेदवारांनी कानात लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण आणि शर्टच्या बटणावर छोटासा स्पाय कॅमेरा लावून कॉपी करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु परीक्षेसाठी नियुक्त भरारी पथकाला याची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील 4 उमेदवारांसह एकूण 10 जणांना पोलिसांनी परीक्षा देतानाच रंगेहाथ पकडले आहे. राज्य राखीव दलाने राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांचे भरारी पथक नेमून या परीक्षेवर देखरेख केली होती.


आरोपींना अटक :योगेश रामसिंग गुसिंगे, सागर संजय सुलाने, योगेश सूर्यभान जाधव, लखन उदलसिंग नायमने ही आरोपींचे नावे आहेत. प्रीतम गुसिंगे, अर्जुन राजपूत, अण्णा व इतर त्यांचे साथीदार आहेत. भरारी पथकाने एकूण १० जणांना अटक केली. आरोपींनी काळ्या रंगाचे शर्ट व बनियन घातले होते. कानाच्या आतील बाजूस बारीक लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण घातले. खिशात एटीएम कार्डसारखे उपकरण ठेवले होते. त्यात एक सिमकार्ड बसवले होते, ते ब्लूटूथशी कनेक्ट होते. शर्टच्या बटणावर स्पाय कॅमेरा लावलेला होता.

'अशी' केली कॉपी :सहजासहजी कुणाला राज्य राखीव दल क्रमांक दिसत नाही. प्रश्नपत्रिका हातात पडताच स्पाय कॅमेऱ्याने पेपरचे स्कॅन करून ते फोटो ऑटोमॅटिकली परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या साथीदारांकडे ई-मेलवर पाठवले जात होते. त्यानंतर इतर साथीदार प्रश्नांची उत्तरे शोधून लगेच संबंधित परीक्षार्थींना ब्ल्यूटूथवर पटापट उत्तरे सांगत होते. परीक्षार्थी योग्य उत्तरांवर खुणा करून ते ओआरएम शीट फाडून टाकत होते. हे सर्व करताना परीक्षा केंद्राबाहेर ठेवलेल्या बॅगेतील मोबाइल फोनही सुरूच ठेवले जात होते.



एका पेपरचे पाच लाख :8500 उमेदवारांनी राखीव दलाची परीक्षा दिली आहे. यातील योगेश जाधव याने पूर्वीदेखील एका परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. भांडुप पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रॅकेट खूप वर्षांपासून कार्यरत असल्याचे समोर आलेले आहे. जवळपास एका पेपरचे पाच लाख, अशी रक्कम घेऊन हा सगळा कारभार केला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

हेही वाचा :

  1. Exam Paper News : पाचशे रुपयांमध्ये परीक्षा सोडवण्यास अधिक वेळ, महाविद्यालयाने आरोप फेटाळले
  2. State Board Exam: बोर्डाच्या परीक्षाकेंद्राबाहेर पुन्हा एका कॉपीबहादराची पोलिसांकडून धुलाई; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
  3. HSC Exam Copy Case: धक्कादायक! विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास केली मदत; 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details