महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्योतिषाकडून मुहूर्त काढून केली चोरी...बारामतीतील १ कोटी रुपयांच्या चोरीचा असा लागला छडा - बारामती चोरी

बारामती शहरामध्ये एप्रिल महिन्यात चोरीची एक धक्कादायक घटना घडली होती. येथे चोरट्यांनी एका घरातून तब्बल १ कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावलाय. पोलीस तपासात एक अजब माहिती समोर आलीय. वाचा पूर्ण बातमी.. (Baramati crime news) (robbed 1 crore in Baramati).

Baramati crime news
Baramati crime news

By

Published : Aug 21, 2023, 9:47 PM IST

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक

पुणे :पुणे जिल्ह्यातीलबारामती येथे चोरीचा एक अजब प्रकार घडलाय. येथे चक्क ज्योतिषाकडून मुहूर्त काढून चोरी करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चोरटे आणि ज्योतिषाला अटक केलीय.

चोरीचा मुद्देमाल

अशी झाली चोरी : बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवकाते नगर येथे सागर गोफणे हे पत्नी तृप्ती व दोन मुलांसह राहतात. 21 एप्रिल रोजी ते तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरी फक्त त्यांची पत्नी व मुले होती. या दरम्यान रात्री 8 वाजताच्या सुमारास चार चोरटयांनी घराच्या कंपाउंडवरून आत प्रवेश केला. त्यांनी तृप्ती गोफणे यांना मारहाण केली, व हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर त्यांनी घरातून ९५ लाख ३० हजार रूपये रोख रक्कम, सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल असा एकूण १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरीचा मुद्देमाल

सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हेगारांचा छडा लावला : बारामती शहरातील लोकवस्तीत ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाची नेमणूक करण्यात आली. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांचा छडा लावला. गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.

चोरीचा मुद्देमाल

ज्योतीषाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा झाला : या चोरीची विशेष बाब म्हणजे, आरोपींनी चोरी करण्यासाठी ज्योतिष रामचंद्र चव्हाण यांच्याकडून मुहूर्त काढून घेतला होता. या ज्योतीषाच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी ज्योतिषालाही अटक केलीय. आरोपींकडून आत्तापर्यंत ७६ लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलीस गेल्या 4 महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करत होते. गुन्ह्यातील आरोपींना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. Thane Crime News : ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड, गॅस कटरने तिजोरी कापून लाखोचे दागिने लंपास
  2. Chain snatching in Nashik : चोरांचे नाशिक पोलिसांना आव्हान, चक्क केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली!
  3. Old Man Murder Case Mumbai: वृद्धाची हत्या करून २ कोटींचा ऐवज लुटला; पोलिसांनी 'ही' युक्ती वापरून लावला शोध

ABOUT THE AUTHOR

...view details