महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक - पुणे बातमी

तपासादरम्यान पोलिसांना हैदराबाद येथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे समजले. त्यामुळे या घटनांमधील आरोपी एकच असू शकतो, यासाठी युनिट दोनच्या पोलिसांनी तातडीने हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची कार्यप्रणाली जाणून घेतली.

police-arrested-thief-in-hyderabad
police-arrested-thief-in-hyderabad

By

Published : Jan 4, 2020, 11:34 AM IST

पुणे - फाॅरेन एक्सचेंज एजंटला लुटणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. राहुल किरण गाटीया (वय 31) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मुंबई येथील फॉरेन एक्सचेंज येथून 12 हजार अमेरिकन डॉलर बदलून घेतले होते.

हेही वाचा-'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुलने अमेरिकन डॉलर पाहिजे, असे सांगून फॉरेन एक्सचेंज कर्मचाऱ्याला कोरेगाव पार्क येथे बोलावले. त्यानंतर त्याच्याकडील डॅालर हिसकावून पळ काढला. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे कर्मचारी या प्रकरणाचा तपास करीत होते.

तपासादरम्यान पोलिसांना हैदराबाद येथे अशाच प्रकारची घटना घडल्याचे समजले. त्यामुळे या घटनांमधील आरोपी एकच असू शकतो यासाठी युनिट दोनच्या पोलिसांनी तातडीने हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची कार्यप्रणाली जाणून घेतली. आरोपी हा आधी बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करतो. नंतर फॉरेन एक्सचेंज सर्व्हिस देणाऱ्या कार्यालयांना फोन करून अमेरिकन डॉलर हवे असल्याची मागणी करतो. त्यांना डिलिवरीसाठी अपार्टमेंटमध्ये बोलवतो. एजंट डॉलर घेऊन आले की, त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून जबरदस्तीने डॉलर चोरून फरार होत असे. तपासाअंती पुणे आणि हैदराबादमधील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हैदराबाद आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणच्या फॉरेन एक्सचेंज सर्विसेस देणाऱ्या कार्यालयांना याबाबत पोलिसांनी माहिती देऊन ठेवली. तसेच अशा प्रकारची फोनवरून मागणी केली असता ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत सांगितले.

त्याप्रमाणे हैदराबादमध्ये एका फॉरेन एक्सचेंज कार्यालयाला कॉल करून सात हजार डॉलरची मागणी आरोपीने केली होती. याची माहिती त्यांनी तत्काळ हैदराबाद पोलिसांना कळविली. माहिती मिळताच हैदराबाद पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. अटक केलेल्या आरोपीला कोरेगाव पार्क येथील गुन्ह्यात वर्ग करून पुणे पोलीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी राहुल याने पुण्यात अशा प्रकारचे दोन गुन्हे केले असून चोरलेले अमेरिकन डॉलर त्याने मुंबई येथील फॉरेन एक्सचेंज येथून 12 हजार अमेरिकन डॉलर बदलून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details