पुणे - शहरात सोनसाखळी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना पोलिसांनी केवळ त्याने घातलेल्या जर्किनवरून त्याचा शोध लावला. रुपेश प्रकाश यादव (वय 36) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या अलीम अलीम शेख (वय 40) या सोनारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जर्किनवरून लावला चोराचा शोध.. 5 सोनसाखळ्यांसह अटक, वाहन चोरीचेही 6 गुन्हे उघड - पुणे लेटेस्ट क्राईम न्यूज
पोलिसांनी या चोरट्याने केलेले सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे आणि वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून 7 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी ओळखल्यानंतर विश्रांतवाडी, विमानतळ आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी या चोरट्याने केलेले सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे आणि वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून 7 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
24 सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होती. विश्रांतवाडी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीवी फुटेज चेक केले असता त्यातून एक संशयित आरोपी निष्पन्न झाला. यापूर्वीही चंदननगर, अलंकार आणि विमाननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीमध्ये तो एकाच प्रकारचे जर्किन घालून वावरत असल्याचे दिसून आले.
आरोपी ओळखल्यानंतर विश्रांतवाडी, विमानतळ आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपीला अटक केली.
हेही वाचा -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण