महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Koyta Gang Pune : कपडे उधार न दिल्यामुळे कोयत्याने दुकान फोडले; पोलिसांनी आवळल्या चार आरोपींच्या मुसक्या - चंदननगर पोलीस

कोयता गँगने कपडे उधार न दिल्याने दुकान फोडल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या कोयता गँगच्या गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Koyta Gang Pune
Koyta Gang Pune

By

Published : Jul 6, 2023, 3:00 PM IST

पुणे :शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून कोयता हल्ल्यातही वाढ झालेली आहे. पोलीस या प्रकरणी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यानंतर देखील कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार थांबले नाहीत. पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असाच एक प्रकार घडला असून पैसे उधार दिले नाही म्हणून टोळीने दुकानात घुसून कोयत्याने दुकानाची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संकेत कमलाकर खोत, ओमकार रिआप्पा खुपसू, मंगेश गणेश मोरे आणि गणेश गौतम कोरडे या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कपडे उधार न दिल्याच्या कारणावरून फोडले दुकान :याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदारांचे चंदननगर परिसरात साईनाथनगर येथे अंजली कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात इतर कामगारासह असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचे दुकानात ओमकार खुपसुगे हा कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. मात्र तक्रारदारांनी आरोपी ओमकार खुपसुगे याला कपडे उधार न दिल्याच्या कारणावरून त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन हातातील कोयत्याने दुकानाची बाहेरील काच फोडली. तसेच दुकानाच्या काचा फोडून दुकानामध्ये येऊन दुकानाचे काऊंटरची काच फोडली. यावेळी त्याने दुकानदाराला वाईट वाईट शिवीगाळ केली.

कोयता दाखवून दहशत :आरोपीने तक्रारदारांच्या बाजुला असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी हॉटले मालक मनोज पन्हाळकर यांना देखील कोयता दाखवून दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे आजबाजुला असलेल्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. जमा झालेले नागरिक त्या ठिकाणाहून निघून गेले. दुकानाच्या परिसरात दहशत निर्माण केल्याने तक्रारदार यांनी अनोळखी आरोपीविरुद्ध तक्रार दखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या :या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी संकेत कमलाकर खोत ( वय १९ वर्षे रा. गलांडेनगर, मदर तेरेसा स्कुलसमोर वडगाव शेरी पुणे,) ओमकार रिआप्पा खुपसू ( वय २४ वर्षे रा. स्वामी समर्थ कॉलनी लेन नं. ०१ राघोबा पाटील नगर साईनाथनगर वडगाव शेरी पुणे ) मंगेश गणेश मोरे ( वय २२ वर्षे रा. शितोळे वस्ती गायकवाड यांचे भाडयाने सारथी शाळेजवळ साईनाथनगर वडगावशेरी पुणे ) गणेश गौतम कोरडे ( वय २३ वर्षे रा. शितोळे परती माताबाची आळंदी ) कुंजीरवाडी लोणीकाळभोर पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime : बँकेत पैसे भरायला निघालेल्या युवकाला कोयता गँगने लुटले; पोलिसांना खुले आव्हान
  2. Pune Crime News : पुण्यात पूना हॉस्पिटलजवळ तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराने केले वार, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे निष्पन्न

ABOUT THE AUTHOR

...view details