महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी त्याने चक्क पाईपने भरलेला टेम्पोच नेला पळवून.. - farmer

गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर एका दुचाकीवरून हे तिघे आले. त्यांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावत आम्ही फायनान्समधून आहोत टेम्पोचा हप्ता थकलेला आहे असे सांगून चालकाला खाली येण्यास सांगितले.

पाईपलाईनसाठी टेम्पो पळविला

By

Published : Jun 11, 2019, 11:15 PM IST

पुणे - गावाकडे शेतात पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एकाने मित्रांसोबत कट रचून चक्क पाईपने भरलेला टेम्पोच पळवून नेला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी संदीप राजेंद्र मोरेसह त्याचे मित्र अमोल विक्रम मोरे आणि समाधान त्रिंबक दौंड या तिघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ९०० पाईप आणि टेम्पो असा ११ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पाईपलाईनसाठी टेम्पो पळविला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संदीप हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दळवेवाडीचा आहे. सध्या चाकण शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव येथे राहतो. तो टपरी चालकाचा व्यवसाय करतो. चाकण येथील त्याच्या घरासमोर अनेक टेम्पो चालक हे गाडी पार्क करून जेवण्यासाठी थांबतात. ही संधी साधून एक दिवस पाईपने भरलेला टेम्पो पाहून त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढून तो पळवायचा असे संदीपने ठरविले. गावाकडे येथे दुष्काळ पडलेला आहे. पाईपने भरलेला टेम्पो चोरला तर त्यातील काही पाईपने शेतात पाईपलाईन करून पाण्याची व्यवस्था करता येईल आणि उरलेले पाईप आणि टेम्पो विकून पैसे मिळतील, हा विचार करून मित्रांसोबत टेम्पो आणि पाईप लंपास करण्याचे तिघांनी ठरवले.

गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर एका दुचाकीवरून हे तिघे आले. त्यांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावत आम्ही फायनान्समधून आहोत टेम्पोचा हप्ता थकलेला आहे असे सांगून चालकाला खाली येण्यास सांगितले. तोपर्यंत एकाने टेम्पो घेऊन धूम ठोकली तर दुसऱ्या दोघांनी चालक लांडगे याला घेऊन जाऊन दिघी येथे सोडले, त्याच्याकडील मोबाईल आणि पैसे जबरदस्तीने काढून घेतले. ९०० पाईप आणि टेम्पो असा ऐकून ११ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज उस्मानाबाद येथून पोलीस पथकाने हस्तगत केला आहे, आणि तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details